

साहित्य विहार संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या दोन दिवसीय बाल कुमार संवाद साहित्य संमेलनात सोमलवार हायस्कूल रामदास पेठ च्या विद्यार्थ्यांनी भरघोस बक्षिसे मिळवून प्रत्येक स्पर्धेत भरभरून यश प्राप्त केले.१)भुलाबाईची गाणी, २)पोवाडा, ३)संभाषण कौशल्य, ४)वृत्तबद्ध कविता पाठांतर स्पर्धा, ५)स्वरचित कविता ,६)कथाकथन, ७)अभिवाचनअशा एकूण सात स्पर्धा होत्या व प्रत्येक स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.१) भुलाबाई ची गाणी- पाच विद्यार्थिनी, सुखदा देशपांडे, आरोही, दिक्षा राजदेकर, श्री मुडेवार प्रथम पारितोषिक, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र ,सुवर्णपदके२) स्वरचित कविता- द्वितीय पारितोषिक कु.राजलक्ष्मी आर्वीकर स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र रोख रक्कम व ग्रंथभेट३) अभिवाचन स्पर्धा- कु.दिक्षा राजदेकर द्वितीय पारितोषिक प्रमाणपत्र रोख रक्कम स्मृतिचिन्ह , ग्रंथ भेट ४) संवाद कौशल्य -आराध्या हारगुळे प्रथम उत्तेजनार्थ रोख रक्कम प्रमाणपत्र ग्रंथ भेट स्मृतीचिन्ह५)कथाकथन स्पर्धा -कु. विधी देशमुखरोख रक्कम, स्मृतीचिन्ह,बक्षीस ग्रंथ भेट प्रमाणपत्र उत्तेजनार्थ प्रथमआपल्या शाळेतील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.प्रमाणपत्र ग्रंथ भेट स्मृतीचिन्ह आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका नीता खोत यांना पण सन्मानित करण्यात आले तुळशी चे रोप आणि प्रमाणपत्र सर्व स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला म्हणून विशेष कौतुक करण्यात आले आणि शाळेला ही स्मृतिचिन्ह देण्यात आलेले आहे

.jpeg)
राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेची डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक ही एक युनिक स्पर्धा गेली 44 वर्षे लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व मुलाखत या टप्प्यात राबविण्यात येते. यामध्ये सोमलवार हायस्कुल अँड ज्युनीयर कॉलेज रामदासपेठ नागपूर येथील इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी कु. स्पृहा तुषार शिनखेडे ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तसेच कु. कीर्ती येनुरकर हिला रजत पदक प्राप्त झाले. या सर्व बालवैज्ञानिकांना शास्त्रज्ञ डॉ. प्रियदर्शनी सावंत, डॉ. चिन्मय गवाणकर, एमकेसीएलचे विवेक सावंत यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर माटुंगा, मुंबई येथे गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या चारही टप्प्यांसाठी सौ. सुषमा केणी (युरेका सायन्स क्लब, सिंधुदुर्ग), प्रभात शाखा प्रमुख सौ. श्वेता पवनीकर, सौ. जयश्री पिंपुटकर, सौ. स्मिता गांधी, सौ. तृप्ति भस्मे व सौ. अर्चना चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रकल्प व मुलाखत या टप्प्यांसाठी श्री. संजय अप्तुरकर (Associate Scientist MRSAC) व सौ. रश्मी बांते मॅडम (Land Resource Management Expert MRSAC) यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली डाखोळे, A.H.M. डॉ. शुभ्रा रॉय यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

An essay competition was organised by WCL under the Vigilance awareness week.Ashutosh Potdar bagged the second position and secured the cash prize of ₹1500.

स्व. अण्णा साहेब सोमलवार स्मृति प्रीत्यर्थ आयोजित आंतरशालेय ASMIRE या स्पर्धेत वर्ग 8 विचा विद्यार्थी देवक चौधरी याला चषक व रोख २००००/- प्राप्त झाले.

शब्दांकुर करंडक : विधी देशमुख हिला वक्तृत्व स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. सुखदा देशपांडे ला प्रोत्साहन पर पारितोषिक प्राप्त झाले.तिला पदक आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला.

Bharat Vikas Parishad had organised "Bharat ko jano" quiz contest. Arnavika Kalbande and Anannya Bhange from junior group had won second prize. They were awarded trophy and the certificate. Guided by Mrs. Vanita Padhye.

कमला नेहरू महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सोमलवार कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावीची कस्तुरी सचिन ठवरे हिला या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .तीन हजार रुपये रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह, आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

ग्रामायण प्रतिष्ठान ग्रामायण प्रतिष्ठान तर्फे पर्यावरण रक्षण जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी इको ब्रिक्स मॉडेल तयार करणे, माती विरहित बाग, पर्यावरण पूरक विज्ञान मॉडेल या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. इको ब्रिक्स मॉडेल या स्पर्धेमध्ये आठव्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी रीया ठाकूर हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 750/- व प्रमाणपत्र प्राप्त झाले. तसेच मातीविरहित बाग या स्पर्धेमध्ये कुमारी अनन्या पोफळी हिला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. तिला रोख रू. 750 /- व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. WASTE MANAGEMENT AWARENESS PROGRAM अंतर्गत ज्या विद्यार्थ्यानी इको ब्रिक्स मॉडेल तयार केले होते त्या विद्यार्थ्यांचा नागपूर महानगर पालिका तर्फे आयुक्त माननीय डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थाना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शाळेला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

